नमस्ते ? मार्क डिझाईनमध्ये आम्ही गेली १२ वर्षे मशीन डिझाईनच्या प्रोसेसला ॲाटोमेट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आमची प्रेरणा म्हणजे आमचे कस्टमर्स – जे अधिकाधिक सोफिस्टिकेटेड मशीन्स बनविण्याच्या प्रयत्नात असतात, व आम्हाला बरोबर घेऊन त्यांच्या कंपनीतील मशीन डिझाईन प्रोसेसही सिस्टिमॅटिक व ॲाटोमेटिक बनवत असतात. स्विफ्ट (केबीई) म्हणजे मशीन डिझाईनचे रूल्स, लॅाजिक, कॅल्क्युलेशन्स, मॅाडेल व ड्रॅाइंग फॅार्मॅट्स वगैरे प्रोसेस कॅप्चर करणे, कॅाम्प्युटर मध्ये त्याचा डेटाबेस स्टोअर करणे. जेव्हा आपल्याला कस्टमाईज्ड मशीन डिझाईन हवे असेल तेव्हा त्या डेटाबेसला आपली मशीन स्पेसिफिकेशन्स दिली की तो त्यावरून कॅल्क्युलेशन्स करून मॅाडेल्स / ड्रॅाइंग्ज तयार करून हव्या त्या फॅार्मॅट्स मध्ये आपल्याला देतो. यासाठी आम्ही एक सॅाफ्टवेअर बनवलंय – त्याचं नाव स्विफ्ट. स्विफ्ट वापरण्यासाठी तुमच्या डिझाईन प्रोसेसची नीट माहिती हवी – म्हणजे त्यातील व्हेरिएशन्स, कॅल्क्युलेशन्स, व्हॅलिडेशन्स, आउटपुट फॅार्मॅट्स वगैरे. या गोष्टी डोमेन एक्स्पर्टला माहीत असतात. त्यांच्यासाठी हे सॅाफ्टवेअर आहे. सॅालिडवर्क्स किंवा एक्सेल वगैरे टूल्स बरोबरही स्विफ्टचं इंटिग्रेशन आहे. स्विफ्ट हे अशा डोमेन एक्स्पर्ट्सना समर्पित आहे, ज्यांना त्यांचं रूटीन मशीन डिझाईनचं काम ॲाटोमेट करून जास्त इनोव्हेटिव्ह कामांसाठी वेळ काढायचा आहे. चला तर मग स्विफ्ट सफारीला !